दिंडोरी : स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी ग्रामपंचायतींस तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी सरपंच संदिप जगन्नाथ उगले, प्रशासक .पी.एस. पाटील (वि.अ.),ग्रामसेवक पी.ए.पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला . पोलीस परेड ग्राऊंड नाशिक येथे झालेेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ,जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं) ,रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.),आनंद पिंगळे आदी उपस्थित होते.१० लाख रुपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते
योगदानामुळे पुरस्कार मिळाला
लोखंडेवाडी गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ,ग्रामपंचायतीचे आजी माजी ग्रा.पं.सदस्य व सर्व नागरीकांनी दिलेल्या योगदानामुळे सदर पुरस्कार मिळालेला असून पंचायत समिती पदाधिकारी, गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
पी.ए. पाटील
ग्रामसेवक लोखंडेवाडी