दिंडोरी – दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी राजारामनगर येथील बी के कावळे विद्यालयाचे प्राचार्य बी के शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, कार्याध्यक्षपदी मविप्र संचलित लोखंडे वाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी वडजे, कार्यवाह पदी ननाशी विद्यालयाचे प्राचार्य जे डी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तशी माहिती समन्वयक के के आहिरे यांनी दिली आहे. शेवाळे हे पूर्वी दुसऱ्या मुख्याध्यापक संघात होते. त्यांना या संघात आणून अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.
दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड बैठक दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा स्तरावर गुणवंत मुख्याध्यापक म्हणून ए डी काळे व गुणवंत शिक्षक डी जी वाणी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी म.वि.प्र. समाज संस्थेचे सेवक संचालक, जिल्हा मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, जिल्हा संघाचे कार्यवाह आर.डी.निकम, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, समन्वयक के के अहिरे, मार्गदर्शक सी बी पवार, व्ही के मोहिते, भगूर नगरपरिषदेचे नगरसेवक व शिक्षकेतर संघटनेचे नेते संग्राम करंजकर, जयेश सावंत, सुनील भामरे, एम टी घोडके, सुरेंद्र बच्छाव, आशिष पवार, पी एन पाटील, गुलाब भुसाळ, एम व्ही बोराडे आदींसह दिंडोरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, मोठ्या संख्येने उपस्थित होते
संघाची नवी कार्यकारिणी अशी –
उपाध्यक्ष – भरत डोखळे, जे एस थविल, के पी गांगुर्डे,
विद्यासचिव – डी व्ही खर्चे,
सहकार्यवाह – अरुण भारमल, मधुकर आहेर,
समन्वयक – डी एस केल्हे
जिल्हा प्रतिनिधी – विजय म्हस्के, आर टी जाधव,
कोषाध्यक्ष – महेंद्र ठाकरे,
सहकोषाध्यक्ष – डी जी शिंदे,
अंतर्गत हिशोब तपासनीस – आर डी कलसाईत,
महिला प्रतिनिधी – संध्या साखरे, एस एस खैरनार,
मार्गदर्शक – बी जी पाटील, डी बी चंदन,
प्रवक्ता – पी डी जोपळे,
कार्यकारिणी सदस्य – ए पी जगताप, पी टी गुंजाळ, केवळ देवरे, पी एन पाटील, डी वाय पगार