दिंडोरी : केंद्रशासनाच्या कृषीच्या तीन कायद्याच्या विरोधात व देशात पेट्रोल डिझेल गॅसच्या भरमसाट वाढलेल्या किमती विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार दिंडोरी तहसील कार्यालया समोर एकदिवसीय उपोषण करून केंद्रसरकरचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील आव्हाड, प्रांतिक सदस्य प्रकाश पिंगळ, कार्याध्यक्ष वाळू जगताप, शहराध्यक्ष गुलाबतात्या जाधव, मोहनराव महाले, बंटी सैय्यद, जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव राऊत, नगरसेविका सौ शैलाताई उफाडे, कचरू गांगोडे, दिलीपराव शिंदे, गुलाब गांगोडे, सचिन आव्हाड, नितीन गांगुर्डे, श्याम गवारे, दशरथ महाले, भारत मोरे, गोपी तावडे, असिफ अत्तार, दिलीपराव देशमुख, छोटुशेठ देशमुख, अप्पा वटाने, पारुबाई डंबाळे, पोपटराव चौघुले, प्रशांत राहणे, राजू तास्कर, रमेश चौधरी, सुभाष तास्कर, महेंद्र मोरे, शंकर गावित, जावेद अत्तार,यांच्यासह असंख्य काँग्रेस नेते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते