दिंडोरी – दिंडोरी तालुक्यात वाळू माफियांचा चांगला सुळसुळाट झाला होता, मात्र तहसीलदार पंकज पवार यांनी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे, याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तालुक्यात वाळू माफियांचा चांगला सुळसुळाट झाला होता, तहसील कार्यालयाची सूत्रे तहसीलदार पंकज पवार यांनी स्वीकारताच सोळा चाकी वाळूच्या सात ट्रक जप्त केल्या व त्यांना २७ लाख रुपये दंड आकारण्यात आला, मात्र दंडाची रक्कम ट्रकमालक भरण्यास तयार नसल्याने आता १ मार्च २०२१ रोजी ट्रकचा लिलाव करून दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार पंकज पवार यांनी सांगितले,
दिंडोरी तालुक्यात कादवा नदी पात्रातून वाळूची नेहमीच तस्करी होते, तसेच लगतच्या नाशिक-पेठ रस्त्यावर वाळुची सर्वाधिक तस्करी होते, याची माहिती घेत तहसीलदार पंकज पवार यांनी ८ नोव्हेंबर २०२० रोजी वाळूची परवाना पेक्षा अधिक क्षमतेने वाहतूक करणारे सात ट्रक पकडले होते. ट्रकमालकांना दंडाची रक्कम भरणे बाबत आदेश देऊनही रक्कम भरणा न केल्याने आता थेट वाहनांचा लिलाव करून दंडाची वसूल केली जाणार आहे, तालुक्यात ही पहिलीच घटना असल्याने वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे,