दिंडोरी -दिंडोरीत पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास पालखेड रोड येथील टपऱ्यांना आग लागत सहा दुकानांना झळ पोहचत चार दुकाने पूर्णतः भस्मसात झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत व्यावसायिकांना धीर दिला. आमदार झिरवाळ यांनी जास्तीत जास्त सरकार कडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दिंडोरी शहरातील पालखेड रस्त्यावरील दुकानांना पहाटे सव्वातीनच्या सुमारास लागलेल्या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली आगीची माहिती कळताच नगरपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पिंपळगाव बसवंत येथिल अग्निश्यामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निश्यामक दल आल्यानंतर आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. आधीच लॉकडाऊनलोड अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत हातावर पोट असणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीमुळे हे व्यापारी हतबल झाले असून पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे मोठे आव्हान व्यापाऱ्यांसमोर आहे. कटलरी दुकान,इलेक्ट्रॉनिक दुकान,मोबाईल शॉपी ,मोटर रिवायडिंगचे दुकान पूर्ण भस्मसात झाले. व्यापाऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी दिंडोरी व्यापारी संघटनेच्यावतीने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे .विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,माजी आमदार रामदास चारोस्कर,तहसीलदार पंकज पवार पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे आदींनी नुकसानीची पाहणी केली. दिंडोरी येथे अग्निशमन गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन झिरवाळ यांनी दिले.
—