दिंडोरी : केंद्र शासनाचे जीएसटी धोरण व्यापारी व सर्वसामान्य जनतेसाठी अन्यायकारक असून सदर धोरण रद्द करत त्यात सुधारणा करून सुलभ करप्रणाली आणावी अशी मागणी दिंडोरी येथील व्यापारी असोशियनने केली आहे
दिंडोरी येथील व्यापारी असोशियन तर्फे तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जी एस टी प्रणालीत अनेक क्लिष्ट अटी शर्ती असून जीएसटी दर अधिक आहे. त्याचा जनतेला त्रास होत आहे सदर प्रणालीत वारंवार बदल होत असल्याने रिटर्न भरण्याबाबत व्यापारी वर्गाला त्रास होत आहे देशभरातील व्यापारी सध्याच्या जी एस टी प्रणालीला विरोध करत आहे तरी सदर प्रणालीत बदल करावे व सुलभ करावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी व्यापारी असोशियन चे नरेश देशमुख,उमाशेठ धोंगडे,विनोद खिंवसरा,रवी जाधव,नयन बुरड आदी उपस्थित होते.