देहरे येथे लपा योजनेच्या कामाचा शुभारंभ व अंबाड येथील लपा योजनेचे पाणीपूजन
दिंडोरी – दिंडोरी ,पेठ, सुरगाणा तालुक्यातील पडणारे पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होत उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
दिंडोरी तालूक्यातील देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प बारा वळण योजना यांची पाहणी तसेच देहरे येथे ल.पा.योजनेच्या कामाचा शुभारंभ अंबाड येथील लपा योजनेचे पाणीपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे होते.
देहरे येथील ल.पा.योेजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी धोंडाळपाडा ग्रामस्थांशी संवाद साधला.ना.जयंत पाटील यांनी कादवा चेअरमन श्रीराम शेटे ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोेरी पेठ तालूक्यात देवसाने मांजरपाडा सह विविध वळण योजना लघु पाटबंधारे आदी सिंंचन प्रकल्प राबवल्याबद्दल कौतुक करत सदर प्रकल्प लवकरच पूर्ण करू आवश्यक त्या नवीन योजनांचे सर्वे करत त्या योजनाही मार्गी लावू असे आश्वासन जयंंत पाटील यांनी दिले. दिंडोरी,पेठ,सुरगाणा तालूक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी भरपुर पाऊस पडतो.हे पावसाचे मोजमाप करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील.पश्चिमेला जाणारे पाणी हे विनावापराचे समुद्राला जावुन मिळते. त्यासाठीच वळणयोजनांचा वापर पाणी अडवण्यासाठी करता येईल.या पाण्यामूळे आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना होणार असून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे
परिसरातील वळणयोजनांच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीवरुन छोटे छोटे केटीवेअर,पाझर तलाव बांधुन स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याला आपण कटिबद्ध राहु,असे जयत पाटील यांनी सांगितले.यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की वळण योजनांसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या,परंतु स्थानिकांना पाणी आरक्षण मिळत नाही. अनेक ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत, परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नांही. मांजरपाडा प्रकल्पातही स्थानिक जनतेला पाणी आरक्षण मिळालेले नाही,ते देण्यात यावे आदी मागण्या झिरवाळ यांनी केल्या.यावेळी कादवा चेअरमन श्रीराम शेटे यांनीही तालूक्यातील सिंचन समस्या मांडल्या.यावेळी देहरे,अबंड योजनांचे पुजन पाटील यांनी केले.स्वागत जि.प.सदस्य अशोक टोंगारे यांनी केले.संयोजन सुरेश पवार यांनी आभार जि.प.सदस्य भास्कर भगरे यांनी मानले.यावेळी माजी खासदार समिर भुजबळ,आमदार नितीन पवार,विठ्ठल पाडवी,सुरेश पवार,प्रकाश वडजे,विश्वास देशमुख, गोपीनाथ पाटील,राजेंद्र उफाडे याच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते.