दिंडोरी – कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. दररोजच्या नियमित ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विविध दिनविशेष विद्यार्थ्यांना माहित व्हावे या हेतूने १४ सप्टेंबर हा हिंदी राष्ट्रभाषा दिवस हिंदी दिन म्हणून जनता इंग्लिश स्कूल मध्ये ऑनलाइन साजरा करण्यात आला.
अध्यक्ष स्थानी प्राचार्य बी. जी. पाटील हे होते. सकाळ व दुपार सत्रात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. प्राचार्य पाटील यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगत हिंदी ही राष्ट्रभाषा असून तिचा आपण आपल्या मातृभाषेत बरोबरच सन्मान केला पाहिजे, असे आवाहन केले. उपमुख्याध्यापक यु डी भरसठ, पर्यवेक्षक बी बी पुरकर, के एस वारुंगसे, यु डी बस्ते आदीसह सर्व जेष्ठ शिक्षक व विषय शिक्षक उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते सातवी सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषय समिती प्रमुख एल एन उगले यांनी केले. उत्कर्षा काकुळते हिने हिंदी चे महत्व सांगत मनोगत व्यक्त केले व अनुज थोरात याने हिंदी प्रतिज्ञा सादर केली. संगीत शिक्षिका देशपांडे यांनी तालासुरात गीत गायन केले. १०० विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल एल उगले, के पी लाटे, एस बी बरडीवाले, व्ही बी भामरे, व्ही बी शिंदे, ए डी आहेर, एस डी पाटील आदींनी परिश्रम घेतले. आभार एस पी गाजरे यांनी मानले.
दुपार सत्रातील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गांच्या हिंदी दिन कार्यक्रमात कृतिका नाठे, सृष्टी पाटील, प्रणिता मोगल, उज्ज्वल नाठे, मयूर बोरस्ते, श्याम बोरस्ते ,सानिका मुल्ला, मेगा आंबेकर, छाया बागुल, वैभव शिंदे ,उन्नती बर्थडे ,तनुजा पिंगळे, संस्कृती क्षीरसागर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एल बी डोंगरे यांनी केले. बी के उफाडे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. आभार एस एस आडके यांनी मानले. यावेळी सर्व हिंदी विषय शिक्षक व ९८ विध्यार्थी ऑनलाइन कार्यक्रमास सहभागी झाले.