दिंडोरी- दिंडोरी तालूक्यातील ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे,’ असे आवाहन शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी केले. दिंडोरी येथील मित्र मंडळ सार्वजनिक वाचनालयात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते. यावेळी रविंद्र मिर्लेकर यांनी तालूक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांना ग्रामपंचायत ,नगरपंचायत ,जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कामाला लागण्याचा सल्ला दिला. मिर्लेकरांनी भाजपाच्या धोरणावर टिका केली. भाजपा सरकारपेक्षा चांगले सरकार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले असून महाविकास आघाडी सरकारने दिंडोरी तालुक्यात अनेक ठिकाणी चांगली विकास कामे केली आहे. ही सर्व कामे जनतेपर्यत पोहचवा असे आवाहनही मिर्लेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर, सुरेश डोखळे, सहसंपर्कप्रमुख पांडुरंग गणोरे, तालुकाप्रमुख सतीश देशमुख, दिंडोरी शहरप्रमुख संतोष मुरुकुटे आदींनी मार्गदर्शन केले. शिवसैनिकांनीही सुचना मांडल्या.यावेळी विठ्ठल अपसुंदे, नाना मोरे, विलास निरघुडे, कैलास पाटील, प्रभाकर जाधव, भाऊसाहेब जाधव, रावसाहेब जाधव, विश्वासराव गोजरे, बाळू निसाळ, सोमनाथ निंबेकर, बोराडे आदीसंंह शिवसैनिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.