कोरोना योध्दांचा रविवारी केला जाणार सन्मान
…..
दिंडोरी – महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी दिडोरी मतदार संघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतीना लोकसख्येनुसार २५ ते ५० लाख रुपये विकास निधी देणार असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत खेडगांव जि.प.गटातील खेडगांव जऊळकेवणी.शिंदवड गोंडेगाव ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे तेथील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व माघार घेतलेल्या उमेदवाराचा सत्कार व त्याचप्रमाणे कोरोना काळात ज्यानी स्वःताच्या जिवाची पर्वा न करता काम केलेले गटातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक,त्यांचे कर्मचारी .प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी त्यांचे कर्मचारी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस या कोरोना योध्दांचा सत्कार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे शुभहस्ते रविवार १७ जानेवारी रोजी सकाळी.१० वाजता ग्रामपालिका कार्यालय सभागृह खेडगाव या ठिकाणी साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन गणपतराव पाटील,सुनिल पाटील,सुरेश डोखळे,माणिकराव पाटील, राजेंद्रशेठ सोनवणे. शांतारामजी बारहाते. शरदराव ढोकरे,बाळासाहेब जेऊघाले, विजय डोखळे, एकनाथ खराटे, सौ संगिता घिसाडे ,सुनिल पाटील दवंगे, जयराम डोखळे, राजेंद्र ऊगले, वसंतराव वाघ, राजेद्र दवगे, व इतर मान्यवर ऊपस्थित रहाणार असुन सदर कार्यक्रमास खेडगाव गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहान दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, म.वि. प्र.संचालक दत्तात्रय पाटील , जि.प. सदस्य भास्कर भगरे (सर) यांनी केले आहे