दिंडोरी – कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी असतांना देखील सरासरी विजबिलाच्या नावाखाली वीजवितरण कंपनीने जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवले.ही वाढीव वीज बिले कमी करण्याचे आश्वासन दिले असतांना त्यावर कुठलीही कार्यवाही न करता सामान्य जनतेला भरमसाठ वीजबिले पाठवून ते भरण्याची सक्ती केली जात आहे. ही वीज ग्राहकांची व शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याचे सांगत राज्य सरकारचा जाहीर निषेध दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी येथील वीज वितरण कार्यालयासमोर वाढीव आलेल्या वीज बिलांची होळी करण्यात आली. वाढीव विजबिले कमी करावी म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैंद, युवामोर्चा प्रदेश सदस्य अंकीतजी संचेती, भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत राजे, प्रमोद देशमुख ,विलास देशमुख, शिवाजीबाबा पिंगळ, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, बाबूशेठ मणियार, श्याम बोडके, तुषार वाघमारे, योगेश बर्डे, योगेश तिडके, अनिल गाडे, संपत पिंगळ, वाहिद मणियार, रणजित देशमुख, अमर राजे, गणेश चव्हाण, बाळासाहेब सोनवणे, दत्तात्रय जाधव, कैलास धात्रक, राम कराटे, बापू बोंबले, निलेश गायकवाड, कैलास गाढवे, राजू शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व वीज ग्राहक उपस्थित होते.