दिंडोरी – तालुक्यातील ग्रामपंचायत खडकसुकेणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापू रामदास गुंबाडे यांची तर उपसरपंचपदी रमेश दामु पालखेडे यांची बिनविरोध निवड झाली. खडकसुकेणा ग्रामपंचायतीची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. त्यात परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळविला होता. नुकतेच सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र गांगुर्डे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी रवींद्र कुलकर्णी, ग्रामसेवक पवन शिरकांडे यांनी काम पाहिले. सरपंचपद निवडीसाठी बापू रामदास गुंबाडे यांचा तर उपसरपंचपदी रमेश दामु पालखेडे यांचा एकमेव अर्ज अआल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रा.पं. सदस्य मधुकर काशिनाथ फुगट, मुक्ता पुरुषोत्तम गणोरे, सुरेखा पालखेडे, विजय शांताराम गांगुर्डे, रंजना शिवाजी गुंबाडे, सुनिता विजय वाघ, बाळू गवळी आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्याचे घोषणा करताच गावातील परिवर्तन पॅनलचे सदस्य व नेते गण तसेच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत निवडीचे स्वागत केले व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरीनाथ ढोकरे, नारायण गणोरे, अमोल गणोरे, विठ्ठल जाधव,रामनाथ जाधव, बापू गणोरे, प्रमोद फुगट, ज्ञानेश्वर गणोरे, विलास कळमकर, दत्तु कळमकर, नारायण आवारे, सुभाष गणोरे, शंकर गणोरे, माधव आवारे ,अनिल जाधव ,सागर गांगुर्डे, जनार्दन पालखेडे, नारायण पालखेडे, विष्णु ढोकरे, लहानु भवर, किरण गवळी, प्रविण गुंबाडे, सागर पालखेडे, विजय वाघ, वसंत फुगट, हिरामण गणोरे, विजय फुगट, बबनराव जाधव , संजय आवारे, प्रकाश कतोरे, केशव ढोकरे, जगण भगरे, निवृत्ती बदादे, गोटीराम आवारे, योगेश पालखेडे, आत्माराम गणोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.