दिंडोरी : तालुक्यातील खडकसुकेने येथील शिवसेनेचे दिंडोरी-पेठ विधानसभा संपर्कप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या सत्तेला सुरुंग लावत परीवर्तन पॅनलने विजय मिळवला. येथे सर्वच्या सर्व ९ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने खडकसुकेणे ग्रामपंचायतीवर फडकला आहे. खडकसुकेणे येथे एकूण नऊ जागांसाठी क्रांती व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत होती. या लढतींमध्ये परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आल्याने प्रस्थापित क्रांती पॅनलला धक्का बसला आहे. यात वार्ड क्रमांक १ मध्ये गुंबाडे बापू रामदास,गवळी द्वारकाबाई बाळू, गणोरे मुक्ता पुरुषोत्तम, वार्ड क्रमांक २ मध्ये गांगुर्डे विजय शांताराम , फुगट मधुकर काशिनाथ, वाघ सुनिता विजय तर वार्ड क्रमांक ३ मध्ये पालखेडे रमेश दामू, गुंबाडे रंजना शिवाजी, पालखेडे सुरेखा नारायण हे विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे खडक सुकेने गावांमध्ये उत्साहात स्वागत करून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला व खडक सुकेने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत आनंद साजरा केला.