दिंडोरी- कोविड विषाणू प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाच्या सुचनांप्रमाणे नगरपंचायत, दिंडोरी व पोलिस निरिक्षक, दिडोरी यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत दिडोरी शहरातील कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या आस्थापनावर कारवाई केली आहे.
दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले व इतर अधिकारी कर्मचारी यांनी दिंडोरी शहरातील व्यक्ती व आस्थापनामार्फत कोविड नियमांचे पालन होत आहे की नाही तपासण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या समवेत संचलन व तपासणी मोहीम राबविली.यात दिंडोरी येथील धुमणे लॉन्स येथे नगरपंचायत व पोलिस विभागाने कारवाही केली.
सदर ठिकाणी विनापरवानगी विवाह सोहळा साजरा केला जात होता. या ठिकाणी शासनाने कोविड नियमांतर्गत निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त व्यक्ती विवाह सोहळ्यास उपस्थित होते. यामुळे नगरपंचायत प्रशासनाने लान्स मालकास दहा हाजर रुपये दंड केला. तसेच लग्न सोहळयास उपास्थितांपेको १२ विना मास्क असणाच्या वन्हाडींसाठी वरापत्याकडून सहा हजार इतका दंड वसुल केला. तसेच धुमणे लॉन्स मंगाल कार्यालय चालकांविरुध्द पोलिस विभागाने कोविड नियमांतर्गत गुन्हा दाखल केला व पुढील आदेश होईपर्यंत हे लॉन्स सील केले.
दिंडोरी शहरातील पालखेडरोड येथील कुलस्वामीनी रेडीमेड या कपड्याच्या दुकानावर कार्यवाही केली. कुलस्वामीनी रेडीमेड हे दुकान लॅाकडाऊन कालावधीत उघडे असून तेथे कापड विक्रि सुरु होती. या कारणाने नगरपंचायतीने सदर दुकानास पाच हाजर दंड करून सदर दुकान सील केले. तसेच पोलिस प्रशासनाने या दुकानमालकाविरुध्द कोविड नियमांतर्गत गुन्हा दाखल कला आहे.
तसेच शहरातील एक विना परवानगी उघडवा असलेल्या दुकारावर पाच हजार इतकी दंडात्मक कारवाई केली शहरात विनामास्क फिरणा-या दोन व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करुन पंचवीशचे इतका दंड वसुल केला.
दिंडोरी शहरात रोज भरणाऱ्या भाजी बाजारात फक्त भाजी च फळे विक्रीस परवाणगी देण्यात आली आहे. इतर वस्तुची दुकाने लावणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करुन दुकान जप्तीची कारवाई करण्यात येईल व गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच नगरपंचायत, दिंडोरी मार्फत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर, व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे अवाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.