दिंडोरी : कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी नाशिक यांनी कोरनाचा प्रादुर्भाव पाहता ब्रेक द चेन नावाची नवीन नियमावली म्हणजेच गाईडलाईन्स जाहीर केली आहे.
या अनुषंगाने दिंडोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात रोज कारवाया केल्या जात आहेत. त्यात सरकारी वाहनाने दिंडोरी नगर पंचायत हद्दीत व दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील हॉटस्पॉट ठरलेली गावे मोहाडी, जानोरी, मडकीजांब ,उमराळे या गावांमध्ये जाऊन अनाउन्सिंग करून लोकांमद्ये जनजागृती तसेच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे..विनाकारण फिरताना मिळून येणे, संचारबंदी चे नियमाचे उल्लंघन करणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा सुरू ठेवणे, तोंडाला मास्क न लावणे सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे अशा वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणारे इसमानवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण पोलीस हवालदार गायकवाड, वाघेरे , दांडेकर पोलीस शिपाई महेश कुमावत चालक पठाण होमगार्ड अपसुंदे ,भरसठ यांनी कारवाई केली असून तोंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून 1400/-रुपये दंड वसूल केला. तसेच सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 08 दुकानदारांवर भादवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून 03 अस्थापना सील करण्यात आलेले आहेत.