दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याकडे कार्यक्षेत्राबाहेरील निफाड ,नाशिक,कळवण तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऊस नोंद केली आहे किंवा ज्यांना ऊस कादवाला द्यायचा असेल त्यांनी तो तोडून कादवा कारखान्यावर गाळपास आणून घालावा असे आवाहन कादवा तर्फे करण्यात आले आहे.
कादवा चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून १५ एप्रिल दरम्यान गाळपाची सांगता होणार आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोड सध्या सुरू असून लवकरच संपूर्ण ऊसतोड पूर्ण होणार आहे. उन्हामुळे मजुरांची कार्यक्षमता घटली असल्याने कमी प्रमाणात ऊस तोड होत आहे. कार्यक्षेत्राबाहेरील निफाड नाशिक कळवण तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी कादवाला द्यायचा असेल त्यांनी तोडणी करून कारखान्याकडे पोहचवावा. कारखाना त्यांना ऊस भावासह वाहतूक व तोडणी खर्च अदा करील. तरी ज्या शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी द्यायचा असेल त्यांनी कादवास १५ एप्रिलच्या आत ऊस पाठवावा असे आवाहन कादवा व्यवस्थापनाने केले आहे.