बुधवार, डिसेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिंडोरी – कादवा सहकारी साखर कारखान्याचे ४४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

ऑक्टोबर 22, 2020 | 5:33 pm
in स्थानिक बातम्या
0
1 2 scaled

दिंडोरी :अत्यंत प्रतिकूल परिस्थिती उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची तयारी  स्वागतार्ह असून इथेनॉल प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सर्वांनी कादवास सहकार्य करावे असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे ४४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीपराव बनकर जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,राज्य सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना झिरवाळ यांनी गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष भाजीपाल्याचे नैसर्गिक अपत्तीने नुकसान होत असताना ऊस हेच पीक शेतकऱ्यांना तारत आहे अन कादवा हा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तारणहार असून चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कादवाला प्राधान्य देत आहे. तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच कारखान्याचे डीस्टीलरी इथेनॉल प्रकल्पास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे झिरवाळ यांनी सांगितले.तसेच सभासद शेतकरी,कामगार अधिकारी या प्रकल्पासाठी स्वयंस्फूर्तीने ठेवी रुपी मदत देत असल्याने हा प्रकल्प लवकरच उभा राहील असा विश्वास झिरवाळ यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार दिलीपराव बनकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वात अत्यंत छोटा कोणतेही बायप्रोडक्ट नसलेला कादवा सुरळीत सुरू असून हा सहकारातील आदर्श आहे. आज निसर्गाच्या लहरीपणात द्राक्ष भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असताना ऊस हाच आधार बनत आहे मात्र केवळ साखर निर्मिती करुन कारखाने चालणे शक्य नसल्याने डीस्टीलरी इथेनॉल प्रकल्प काळाची गरज असल्याचे बनकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कादवाचे वाटचालीचा आढावा घेत कादवाने गेल्या काही वर्षात देखभाल दुरुस्ती चे कामे करताना मशिनरी बदलताना आधुनिक व अधिक क्षमतेच्या टाकल्याने गाळप कार्यक्षमता वाढली असून शासनाने २५०० मेंटन प्रतिदिन गाळपास परवानगी दिली आहे यंदा सुमारे १० हजार हेक्टर ऊस  नोंद झाली असल्याने एक महिना कारखाना लवकर सुरू केला असून सूत्रबद्ध ऊसतोड कार्यक्रम आखत ऊसतोड करण्यात येईल. कादवाचे सातत्याने साखर उतारा अधिक असून एफआरपी सर्वाधिक आहे. मात्र सद्या अतिरिक साखर उत्पादनामुळे साखरेला उठाव नसल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती काळाची गरज बनली असून त्या दृष्टीने कारखान्याने तयारी केली असून सदर प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ठेवी ठेवण्याचे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. त्यास उपस्थित सभासद,शेतकरी,कामगार अधिकारी यांनी प्रतिसाद देत ठेवी ठेवण्याचे जाहीर केले. प्रारंभी  सौ व श्री. मच्छीन्द्र पवार(पाडे),सौ व श्री.खंडेराव दळवी (लखमापूर ), सौ व श्री. विनायक देशमुख (खेडले), सौ व श्री.मधुकर बोरस्ते (हातनोरे), सौ व श्री  मिनानाथ जाधव  (बोराळे) यांचे हस्ते गव्हाण पूजन होत मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकण्यात आली.
यावेळी आमदार दिलीप बनकर,व्हा चेअरमन माजी आमदार उत्तम बाबा भालेराव,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,दत्तात्रेय पाटील,प्रकाश वडजे,विश्वासराव देशमुख, अनिल देशमुख, संजय पडोळ,सदाशिव शेळके संचालक मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान,बापू पडोळ,दिनकर जाधव,सुनील केदार,विश्वनाथ देशमुख,शिवाजीराव बस्ते, सुकदेव जाधव,सुभाष शिंदे,कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे,संदीप शार्दूल, चंद्रकला नामदेव घडवजे,शांताबाई रामदास पिंगळ,साहेबराव पाटील,संपतराव कोंड,शेखर देशमुख,बबन देशमुख,विलास वाळके,किसन भुसाळ, भास्कर भगरे,शाम हिरे,राजेंद्र उफाडे,डॉ योगेश गोसावी,विठ्ठराव संधान, संपतराव घडवजे, दशरथ कोंड,दत्तात्रय जाधव, बाळासाहेब आथरे विजय वाघ,दत्तात्रय गटकळ,नरेश देशमुख, रघुनाथ जाधव, शांताराम कावळे,बाळासाहेब पेलमहाले,तानाजी पगार,अनिल ठुबे,दिलीप जाधव, मोहम्मद सैय्यद , आदी सर्व संचालक सभासद,शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.तर स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले
इथेनॉल प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी ठेवी जमा
कादवा कारखान्याची २००७ साली आर्थिक स्थिती बिकट असल्याने कोणतीही बँक कर्ज देत नव्हती. त्यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांनी पतसंस्था उभी करून तेथे ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. सदर पतसंस्थेच्या आर्थिक पत पुरवठ्यामुळे कादवा सुरू होऊ शकला आता पुन्हा साखर कारखाना सुरू ठेवायचा असेल तर डीस्टीलरी इथेनॉल प्रकल्प सुरू करणे काळाची गरज बनली आहे. आज कारखान्याची भक्कम आर्थिक स्थिती बघता या प्रकल्पासाठी बँक कर्ज देण्यासाठी तयार आहे. मात्र त्यास काही रक्कम ही कारखान्यास अगोदर भरावी लागणार असून त्यासाठी सर्वांनी  कारखान्याकडे ठेवी ठेवाव्या त्यास कारखाना चांगले व्याज देईल असे आवाहन अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. त्यास उपस्थित सभासद,शेतकरी,कामगार,अधिकारी,माजी अधिकारी कामगार यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ठेवी ठेवण्याचे जाहीर केले .यात कामगार युनियनसह कामगारांनीही ठेवी देण्याचे जाहीर केले.पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ठेवी जमा झाल्या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाथर्डी फाटा येथे इलेक्ट्रिक कारच्या शोरूमला आग

Next Post

राजस्‍थान रॉयल्‍सची लढाई संपली

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
RAJ 9501

राजस्‍थान रॉयल्‍सची लढाई संपली

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011