दिंडोरी :कर्मवीर कै रा.स.वाघ, कै बाबुराव कावळे यांनी मातेरेवाडी बोपेगाव च्या माळरानावर कादवा कादवाचे वृक्ष लावत मागास असलेला दिंडोरी तालुका समृद्ध केला. श्रीराम शेटे व त्यांचे संचालक मंडळाने कादवा प्रगतीपथावर नेत जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील एकमेव कादवा सुरू ठेवत उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला आहे. काळाची पावले ओळखत इथेनॉल प्रकल्प हाती घेत या वृक्षाचा वटवृक्ष होत असून यामुळे कादवाची भरभराट होईल त्यास सर्वांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीं केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे आसवणी इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे छोटेखानी कार्यक्रमांत विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते. पुढे बोलताना नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असून तेथे स्थानिक युवकांना रोजगार मिळाला यासाठी कुशल कामगार तयार करण्यासाठी कादवा कारखान्यावर एक आयटीआय व्हावे यासाठी आपला प्रयत्न आहे तसेच नर्सिंग कॉलेजची प्रवेश क्षमता वाढवली जाईल व तालुक्यातील सर्व रस्त्यांच्या सुधारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कारखान्याच्या शासनस्तरावरील समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून सर्वांनी सभासदांनी संचालक मंडळास सहकार्य करावे असे आवाहन झिरवाळ यांनी केले.
यावेळी बोलताना चेअरमन श्रीराम शेटे यांनी आज केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालले शक्यच नाही म्हणूनच केंद्र सरकारने इथेनॉल साठी प्रोत्साहन दिले आहे. कादवाने ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. आमचे संचालक मंडळाच्या हाती सभासदांनी सत्ता दिली त्यावेळी कारखान्याची काय स्थिती होती हे सर्व सभासदांना माहीत आहे त्यावेळी कादवा ला कारखाना सुरू करणेसाठी कुणी कर्ज द्यायला तयार नव्हते आज अनेक कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्पाला बँका कर्ज द्यायला तयार नाही पण कादवा ची भक्कम आर्थिक स्थिती पाहता तीन दिवसात कादवाचे कर्ज मंजूर झाले आहे .कारखान्याला त्यासाठी 25% निधी भरण्याची गरज आहे त्यासाठी अनेक सभासद ठेवी ठेवत आहे तरी सर्व सभासदांनी ठेवी ठेवत कारखान्याचे प्रगतीत हातभार लावावा मार्चअखेर दरम्यान सर्व ऊस तोडले जाणार असून कादवा कोणतेही उप पदार्थ निर्मिती नसताना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत असून आज ऊस हे एकमेव शाश्वत भाव मिळणारे व परवडणारे पीक असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लावावा असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले आहे.बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,माजी संचालक संजय पडोळ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक हेमंत माने, कार्यलक्षी संचालक दत्तात्रय वाघचौरे, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिप सदस्य भास्कर भगरे, संजय पडोळ, विलास कड, राजू ढगे, प्रकाश पिंगळ, विठ्ठल संधान, रावसाहेब पाटील, शाम हिरे, अनिल देशमुख, राजू उफाडे, डॉ.अनिल सातपुते, डॉ. योगेश गोसावी, जयराम पाटील, गंगाधर निखाडे,तौसिफ मणियार आदी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक बाळासाहेब जाधव यांनी केले.