दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार ४ रोजी ऑनलाईन पद्धतीने चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव कार्यकारी संचालक हेमंतराव माने यांनी दिली.
कोव्हिडच्या प्रारदुर्भावामुळे यंदा वार्षिक सर्वसाधारण सभा लांबली होती .कोरोना चा पुन्हा प्रारदुर्भाव वाढल्यामुळे जिल्हाधिकारी नाशिक यांनी सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे सूचित केले असून त्यानुसार गुरुवार ४ रोजी दुपारी १ वाजे पासून ऑनलाईन सभा होणार आहे सदर सभेत सभासदांना सहभागी होणेसाठी ऑनलाईन लिंक एसएमएस द्वारे कारखान्याकडे सभासदांच्या नोंदवलेल्या रजिस्टर मोबाईल ला पाठविण्यात आली आहे तसेच www.kadwasugar.com या संकेतस्थळाला भेट देत तेथील लिंक वर १ मार्च रोजी सायंकाळी ५ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे .ऑनलाईन सभेच्या रजिस्ट्रेशन साठी काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर 9405874559 / 9405874569 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने कोव्हिडच्या प्रारदुर्भावामुळे कुणासही प्रत्यक्ष सभेस उपस्थित राहण्यास परवानगी दिली नसल्याने कुणीही प्रत्यक्ष हजर राहू नये मात्र सदर सभेस ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे व्हा चेअरमन उत्तमबाबा भालेराव व संचालक मंडळाने केले आहे.