दिंडोरी : येथील भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दिंडोरी कार्यालयाने दिंडोरी नगरपंचायतची ९१ हजार ७ रुपये थकबाकी न भरल्याने भारत संचार निगमचे कार्यालय सील करण्यात आले. येथील भारत संचार निगमच्या दिंडोरी कार्यालयाकडे नगरपंचायत च्या कराची थकबाकी तीन वर्षांपासून प्रलंबित होती.नगरपंचायत प्रशासनाने वारंवार नोटीस पाठवून ही थकबाकी भरण्यात आली नाही. त्यामुळे सदर कार्यालय नगरपंचायततर्फे सील करण्यात आले. मुख्याधिकारी नागेश येवले यांचे मार्गदशना खाली ही कारवाई करण्यात आली .यावेळी प्रशांत पोतदार, प्रशासकीय अधिकारी, मावलकर, कर निरीक्षक, ईश्वर दांडगव्हाळ, सागर भदाणे, चिंतामण वाघ, बाळू निसाळ उपस्थित होते.