दिंडोरी : विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नामुळे करंजवण येथे राज्य शासनाने प्राथमीक आरोग्य केंद्रास मंजुरी दिली आहे. त्यासाठी आदेशही काढले आहे. गेल्या अनेक वर्षापासून करंजवण येथे प्राथमीक आरोग्य केंद्र मंजूर व्हावे याकरीता नागरीकांची मागणी होती. शासनाच्या या निर्णयामुळे करंजवण, खेडले, लखमापूर , दहेगांव, वाघळूद, मेळूस्के, ओझे , नळवाडी , पिंपरखेड, दहिवी कादवा म्हांळुगी, माळेगांव काजी, कोशींबे येथिल नागरीकांना याचा लाभ होणार आहे .नरहरी झिरवाळ यांचे करंजवण व पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार मानले आहे.