दिंडोरी – कोरोना सारख्या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रात्रं -दिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या
दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशा सेविका,गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचे कार्य कौतुकास्पद असून ,त्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त असल्याने दिपावली निमित्त सन्मानित करण्यात आले असल्याचे अहिवंत वाडी जिल्हा परिषद सदस्या रोहिनी ताई गावीत यांनी व्यक्त केले.
दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा -गट प्रवर्तक यांना जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावीत यांच्या वतीने गौरवपत्र ,साडी देवून कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी गावित बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असतांना, जनतेची सेवा करण्यासाठी देवाच्या रूपाने धावून आले ते पोलिस, आरोग्य कर्मचारी, व समाजातील प्रमूख घटक. पंरतु, आरोग्य सेवेतील काहीसे दुर्लक्षित असलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका ज्या कोरोना कालावधीत वरिष्ठांचे आदेश प्रमाण मानून सदैव न डगमता अहोरात्र सेवेत तत्पर केले.
कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती आनंदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक सदाशिव गावित, तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी,वैद्यकीय अधिकारी डॉ साबळे,सरपंच पंढरीनाय भरसट, प्रहारचे तालूका प्रमुख सुकदेव खुर्दळ,नारायण तुंगार आदीं सह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरवाची शिदोरी आयुष्यभरासाठी प्रेणादायी
तालूक्यातील अहिवंत वाडी जिल्हा परिषद गटातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशासेविका ,गट प्रवर्तक यांनी कोरोना काळात ,केलेल्या कामाची पावती म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिनी गावित यांनी केलेला गौरवाची शिदोरी आयुष्यभरासाठी प्रेणादायी असेल असे आशासेविका वाघ यांनी सांगितले.