दिंडोरी : आदर्श संसद ग्राम योजनेत देशातील दहा ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या अवनखेड ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून सदर ग्रामपंचायतीस राज्य विभाग जिल्हा व तालुकास्तरावर पुरस्कार मिळाले आहे . गेली पंधरा वर्ष सरपंच असलेल्या भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक बिनविरोध झाली आहे
नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी अवनखेड गावाने संमती दिलेल्या उमेदवारांनी नऊ जागांसाठी नऊ अर्ज दाखल केले. त्यामुळे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे बिनविरोध निवडीमध्ये सरपंच नरेंद्र कोंडाजीराव जाधव, मंगेश विष्णू जाधव, रघुनाथ रुंजा गांगुर्डे, विनायक काशिनाथ निकम, कल्पना रमेश जाधव, मंदाबाई काळू लांडे, अलका साहेबराव बोरस्ते, अर्चना पोपट पिंगळ, भारती किरण पवार यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.आज अर्ज छाननी नंतर बिनविरोध निवड निश्चित होताच फटाके फोडत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी गुलाब पिंगळ, त्र्यंबक पिंगळ, चंद्रकांत जाधव, विश्वनाथ जाधव, सतिश निकम, प्रतिक पाटील, रंगनाथ जाधव, विष्णू मोरे, अशोक शिंदे, बाळासाहेब पिंगळ, नंदू मोरे,नंदु पिंगळ, भिकाजी शिंदे आदी उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी सदैव कटीबध्द राहु.
अवनखेड ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली. सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी सदैव कटीबध्द राहु.
नरेंद्र जाधव, सरपंच, अवनखेड