दिंडोरी – तालुक्यातील जानोरी येथील एका अल्पवयीन मुलीस येथील युवकाने मोबाईल वरून जवळीक साधत वेळोवेळी मेसेज करून मानसिक त्रास दिल्याने मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने जानोरी येथील २३ वर्षीय युवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त असे की, जानोरी येथील अभियांत्रिकी कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय युवतीस जानोरी येथील २३ वर्षीय युवकाने सदर मुलीचा मोबाईल नंबर मिळवत वेळोवेळी तिच्याशी जवळीक निर्माण करीत मोबाईल फोनद्वारे व्हाट्सअप व इंस्टाग्रामॲप वर मेसेज करून व कॉल करीत मानसिक त्रास दिल्याने या युवतीने विष प्राशन करीत आत्महत्या केल्याने मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी युवका विरुद्ध दिंडोरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सोमेश अशोक घुमरे (वय -२३) याच्याविरुद्ध मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. याबाबत अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले अरुण आव्हाड आदीं करीत आहे.