दिंडोरी – माध्यमिक इ.9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड 19 ची RTPCR चाचणी करण्यास बोपेगाव आश्रमशाळा कोविड सेंटर मध्ये सुरवात करण्यात आली आहे. तालुक्यातील 49 मुख्याध्यापक यांची चाचणी घेण्यात आली. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक ,प्राध्यापक व कर्मचारी असे 738 सेवकांची चाचणी दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान केली जाणार आहे. तशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिली.
शासन परिपत्रकाप्रमाणे इ.9 वी ते 12 वीच्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी इ.9 वी ते 12 वीला अध्यापन करणाच्या सर्व शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोंविड 19 ची RTPCR चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातील इ.9 वी ते 12 वी ला अध्यापन करणान्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची RTPCR चाचणी करण्याचे नियोजन पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी तयार केले आहे.त्यानुसार दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची नांवे आधल्या दिवशी आमच्याकडे दिलेल्या नमुन्यात पाठवावी व त्या तारखेस संबंधित सेवकांना चाचणीसाठी बोपेगाव केंद्रावर सकाळी 10 ते 1 या वेळेत पूर्ण वेळ पाठवावे.आधल्या दिवशी ज्यांची नांवे पाठविली आहेत त्याच सेवकांना पाठवावे कारण त्यांच्या नावाचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार आहे.
बोपेगाव येथील केंद्रावर डॉ संदिप राहटळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम काम करत आहे.माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची कोविड चाचणी यशस्वीतेसाठी साठी पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैधकिय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, गटशिक्षणाधिकारी बी डी कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप, एम. एस. कोष्टी, सी. बी. गवळी, के. पी. सोनार, एस. पी. पगार, एस. डी. अहिरे, वंदना चव्हाण व केंद्रप्रमुख आदी विशेष परिश्रम घेत आहे.