दिंडोरी –कोरेाना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने राजाश्रय फाऊंडेशन नाशिक व राजे हॉस्पिटल दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिंडोरी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, राजेंद्र राजे, रमेश बोरस्ते, रणजित देशमुख, सूचित देशमुख, डॉ विलास देशमुख, डॉ. ज्ञान राजे, निलेश मते, आदींसह मान्यवर उपस्थित होते, यावेळी राजाश्रय फाऊंडेशन चे निलेश देशमुख यांनी रक्तदात्याचे आभार मानले, यावेळी सौ. राजश्री देशमुख, बाबासाहेब देशमुख, नितीन देशमुख, हंसराज देशमुख, शिव राजे, रोहित घोरपडे उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.