दिंडोरी – भाजप सरकारच्या धोरणाविरोधात दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सेंटर ऑफ इंंडीयन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. येथील मुख्य चौकात माकपचे जिल्हा सेक्रेटरी सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चारही बाजूंंचे वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी, किसान सभा तालुकाध्यक्ष देविदास वाघ, डीवायएफचे तालुकाध्यक्ष आप्पा वटाणे, जनवादी महिला तालुकाध्यक्षा लक्ष्मीबाई काळे, रमेश चतुर, दत्ता ठाकरे, गोटीराम भोई, हिरामण गायकवाड, श्रीराम पवार, दौलत भोये, परशराम गांगुर्डे, अंबादास सोनवणे, सखाराम कडाळे, तुळसाबाई गांगोडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आहेत प्रमुख मागण्या
– केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि प्रास्तवितज वीज विधेयक रद्द करा
– केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि प्रास्तवितज वीज विधेयक रद्द करा
– वनाधिकार कायद्याची काटेकोर व प्रभावी पणे अंमलबजावणी करावी
– प्रलंबित सर्व वनदावे मंजूर करून ताब्यात असलेली दहा एकर पर्यंत वनजमिन दावेदारांस कब्जेदार सदरी ठेवून सर्वत्र 7/12 द्यावा
– वन जमीन कसण्यास अयोग्य मारलेला शेरा काढून टाकावा
– अवकाळी पावसाने पिकांची अतोनात नुकसान केलेले आहे. त्यामुळे शेतकर्याला 25,000 प्रति एकरी द्यावे
– गरीब गरजू आदिवासींना सरसकट खावटी मंजूर करून तात्काळ द्यावी
– करोना काळातील वीज बिले माफ करा
– दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला प्राधान्य कुटुंब कार्ड द्या
– नार पार योजने अंतर्गत पश्चिमेला गुजरातला वाहून जाणारे पाणी लहान बंधारे बांधून लिफ्ट करून पूर्वेकडे मराठवाडा खान्देश कडे घ्यावे.
– मका ,भात, सोयाबीन इतर पिके सरकारी खरेदी केंद्रे सुरू करून हमीभावात त्वरित खरेदी करावे.