दिंडोरी – तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव सुरुच असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. तसेच, नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरत आहे. शहरात दोन दिवसात १६ृ४ रुग्ण वाढले असून औद्योगिक क्षेत्रात रुग्ण आढळणे सुरूच आहे.
बुधवारी पालखेड एमआयडीसीतील एका कंपनीतील सहा कामगार बाधित आढळले. त्यात शहरातील मुरकुटे गल्ली, शिवाजीनगर येथील तीन जणांचा समावेश आहे. तर पिंपळगाव केतकी येथील अंबड कंपनीतील एक कामगार व शहरातील जाधव गल्लीत एक जण बाधित आढळला. गुरुवारी पुन्हा ८ जण बाधित आढळले. त्यात वरखेडा, नवे धागुर येथे प्रत्येकी एक, जवळके दिंडोरी ३ तर शहरात वक्रतुंड नगर येथे अवनखेड येथील एक कंपनीतील एक कामगार व जानकी संकुल मध्ये दोन रुग्ण आढळले. नागरिकांनी काळजी घेत शासनाने दिलेल्या दिशा निर्देश नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे