सासाराम (बिहार) – दारूबंदी केलेली असताना दारूच्या तस्करीसाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. संशयितांचे फंडे वाचून तर तुम्ही थक्क व्हाल. दिवसेंदिवस दारूची तस्करी वाढत चाचली असून, दारू निर्धारित स्थळी पोहोचवण्यासाठी चक्क वाहनांचे चालक आणि नंबर प्लेटसुद्धा बदलल्या जात आहेत. एक चालक ३० ते ४० किलोमीटर वाहन चालवतो. दोन दिवसांपूर्वी दारू घेऊन निघालेल्या अल्टो कारचालकाला अटक केली होती. चालक आकाशदीप विश्वकर्मा यांनं हा खुलासा केला आहे.
सासारामचे सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त तारिक मेहमूद यांच्यासमोर संशयित चालकानं खुलासा केला. तो म्हणाला, झारखंडमधून अल्टो कारमध्ये दारूचा साठा भरून त्याला शेरघाटीजवळ त्याला कार देण्यात आली. ती कार डेहरीपर्यंतच पोहोचवण्यास त्याला सांगण्यात आलं होतं. डेहरीमध्ये दुसर्या चालकाला गाडी हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु त्यापूर्वीच तो पकडला गेला. झारखंड इथून दारूचा साठा भरून निघालेल्या वाहनांच्या चालकासह नंबर प्लेटसुद्धा रस्त्यात बदलल्या जातात, असं त्यानं सांगितलं. जेणेकरून जिथून दारूसाठा निघालेला आहे, तिथले वाहन आणि नंबरप्लेटचा सुगावा लागू नये. असा प्लॅन होता.
दारूसाठा निर्धारित स्थळी पोहोचवण्यासाठी तस्कर ३ ते ४ नंबरप्लेट बदलतात. त्यांच्यावर संशय निर्माण होऊ नये म्हणून वाहनांच्या व्यावसायिक नंबरप्लेट ठेवल्या जातात.
दारू तस्कर नेहमीच दुसर्या वाहनांचे नंबर आपल्या वाहनांना लावतात. त्या नंबरचा ऑनलाइन शोध घेतल्यानंतर लक्षात येतं की तो नंबर कोणाचा आहे. रस्त्यामध्ये वाहन थांबवल्यानंतर त्याच्या मालकाचं नाव सांगितलं जातं.
राकेश कुमार आणि लव पासवान यांच्यासोबत पकडला गेलेल्या अल्टोचालक म्हणाला, हरियाणाहून दारूचा साठा घेऊन येणार्या ट्रकची नंबरप्लेट आणि चालक बदलले जातात. जेणेकरून पकडल्या गेल्यानंतर वाहनात दारू कोणत्या ठिकाणाहून आली आणि त्याचा चालक होण होता हे चालकाला माहिती नसेल. त्यामुळेच पोलिस किंवा दारू तस्कारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.