तपोवनातील खुनाची उकल
नाशिक – गेल्या रविवारी तपोवनातील बटुक हनुमान मंदिर परिसरात ६० वर्षीय इसमाच्या खुनाचा उलगडा झाला आहे. दारू पिण्याच्या वादातूनच मित्राने डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पवार असे मयत इसमाचे नाव आहे. तर खुन प्रकरणी रवी उर्फ पिंट्या लिलके यास अटक करण्यात आली आहे. मयत संतोश पवार आणि रवी लिलके यांच्या दारू पाण्यावरून वाद झाला. त्यातून हाणामारी झाली असता, रवीने सिमेंटचा गट्टू संतोष पवार यांच्या डोक्यात मारला. घाव वर्मी बसल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार जगदीश जाधव, विजय सूर्यवंशी, वाल्मिक पाटील, योगेश घुगे यांनी यशस्वी तपास केला. याबद्दल तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
विडीच्या थोटक्याने मिळाली दिशा
मृत पवार यांच्या मृतदेहजवळ बिडीचे थोटके पोलिसांना मिळाले होते. त्याशिवाय घटनास्थळी काहीही नव्हते. त्यावरून एकच व्यक्ती घटनास्थळी होती. हाच एक धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि गुन्ह्याची उकल झाली.







