नाशिक – लोकशाहीचा शेवटचा टप्पा असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत नवोदितांनी बाजी मारली असून गावोगावी बदलाचे वारे वाहिल्याचे चित्र निकालावरून दिसून आले. नाशिक तालुक्याचा दारणा पट्यात सर्वच ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. मतदानाची वाढलेली टक्केवारी सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचे मतदानाच्या दिवशीच निश्चित झाले होते.
लहवितमध्ये ग्रामविकासची सत्ता
तालुक्यात मोठी व राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या लहवित ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान उपसरपंच प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,शंकर मुठाळ, यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने १५ पैकी ८ जागा जिंकून सत्ता राखली आहे. तर पी.एल.गायकवाड ,निवृत्ती मुठाळ,खंडू गायकवाड,भारत आहेर,संदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने ६ जागा तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. यामध्ये ग्रामपविकास पॅनलचे श्वेता मोरे,सोमनाथ जारस,शंकर ढेरिंगे, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,संजय मुठाळ,शोभा लोहकरे,विमल मुठाळ व गायत्री काळे तर परिवर्तन पॅनलचे संपत लोहकरे, अर्चना पाळदे,निवृत्ती मुठाळ,कविता मुठाळ,किरण गायकवाड, माधुरी गायकवाड हे विजयी झाले तर गोटीराम सूर्यवंशी हे अपक्ष निवडून आले आहे.
नानेगावमध्ये परिवर्तनची सरशी
येथील ग्रामपंचायतीच्या ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित ७ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. त्यात परिवर्तन पॅनलचे वासुदेव पोरजे,भारती राजाराम शिंदे, संपत केरू बर्डे,ज्ञानेश्वर सहादु शिंदे,वर्षा संदीप आडके तर ग्रामपविकास पॅनलचे काळू निवृत्ती आडके,अशोक सखाराम आडके, अनिता कैलास आडके तर विमल भगवान आडके या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या तर आशा सुनील मोरे व नंदिनी संजय काळे या बिनविरोध निवडून आल्या आहे. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच प्रमोद आडके तर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व अशोक सखाराम आडके यांनी केले.
वंजारवाडीत आपलाची सरशी
वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी महाविकास आघाडी व आपला पॅनलमध्ये दुरंगी लढत झाली यात तुकाराम शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,अशोक मुसळे,भाऊसाहेब शिंदे आदींच्या नेतृत्वाखालील आपला पॅनलने ८ जागा जिंकल्या त्यात वॉर्ड १ मध्ये- ज्ञानेश्वर रामदास शिंदे,मनीषा रामहरी शिंदे,ज्योती योगेश लोहारे,वॉर्ड २ मध्ये बाळू गणपत लोहारे, मंदा चंद्रभान शिंदे,ज्ञानेश्वर कारभारी शिंदे वॉर्ड तीन मध्ये तुकाराम दगडू शिंदे,जयश्री संजय म्हसळे तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे अनिता बोथे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या तर याच पॅनलच्या विद्यमान सरपंच कमल अशोक कातोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.यावेळी पप्पू काळे,कैलास शिंदे,विलास शिंदे,लहानू शिंदे, चंद्रभान शिंदे,जनार्दन शिंदे,बाळू शिंदे,किसन शिंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दोनवाडेत ठुबेंची सरशी
दोनवाडे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते राष्ट्रवादी नेते अशोक ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने ४ जागा जिंकून सत्ता राखली आहे.विद्यमान सरपंच शैला अशोक ठुबे यांच्यासह नंदा शांताराम बोराडे,बाळासाहेब रघुनाथ ठुबे,सविता भाऊसाहेब शिरोळे हे विजयी झाले तरी बाळासाहेब बोराडे,ज्ञानेश्वर शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलचे मीरा भिवाजी कांगणे,उत्तम पोपट पवार,नर्मदा सोपान सांगळे हे ३ उमेदवार विजयी झाले.
वंजारवाडीत आपलाची सरशी
वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. सत्ताधारी महाविकास आघाडी व आपला पॅनलमध्ये दुरंगी लढत झाली यात तुकाराम शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,अशोक मुसळे,भाऊसाहेब शिंदे आदींच्या नेतृत्वाखालील आपला पॅनलने ८ जागा जिंकल्या त्यात वॉर्ड १ मध्ये- ज्ञानेश्वर रामदास शिंदे,मनीषा रामहरी शिंदे,ज्योती योगेश लोहारे,वॉर्ड २ मध्ये बाळू गणपत लोहारे, मंदा चंद्रभान शिंदे,ज्ञानेश्वर कारभारी शिंदे वॉर्ड तीन मध्ये तुकाराम दगडू शिंदे,जयश्री संजय म्हसळे तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे अनिता बोथे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या तर याच पॅनलच्या विद्यमान सरपंच कमल अशोक कातोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.यावेळी पप्पू काळे,कैलास शिंदे,विलास शिंदे,लहानू शिंदे, चंद्रभान शिंदे,जनार्दन शिंदे,बाळू शिंदे,किसन शिंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवगेदारणात संमिश्र
येथील ग्रामपंचायतीच्या ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या.या ठिकाणी स्वतंत्र लढती झाल्या त्यात ७ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. त्यात अशोक भागुजी पाळदे, हिरामण दत्तात्रय पाळदे, हिराबाई ज्ञानेश्वर कासार,दामिनी शिवाजी कासार,पुष्पा गजीराम कासार, दीपक मधुकर कासार,सविता किरण कासार हे विजयी झाले तर मीना प्रभाकर कासार व अरुण माळी हे बिनविरोध निवडून आले आहे.
बेलतगव्हाण नवोदितांच्या हाती
येथील ग्रामपंचातीच्या ९ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित ६ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते येथेही स्वतंत्र लढती झाल्या त्यात आकाश अशोक पागेरे, सुरेखा ज्ञानेश्वर पाळदे,लता विष्णू घोडे, ताराचंद जगन्नाथ पाळदे, अतुल दत्तात्रय पाळदे, मोहनीश वसंत दोंदे,सुनीता पाळदे हे निवडून आले असून पुष्पा दिनकर धुर्जड, निकिता मोहन पाळदे, सिंधूबाई देवराम पवार या बिनविरोध निवडून आल्या आहे.
लोहशिंगवेत शेतकरी विकास पॅनलची सत्ता
येथील ग्रापंचायतीच्या ९ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते यात माजी सरपंच भगवान जुंद्रे व ऍड त्र्यंबक जुंद्रे यांच्या नेतृत्वाखालील
शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा जिंकत गावात सत्तांतर करीत माजी सरपंच संतोष जुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली नवचैतन्य पॅनलचा धुव्वा उडविला.विजयी उमेदवारांमध्ये अविनाश राजाराम वाघचौरे,योगिता युवराज जुंद्रे, युवराज भगवान जुंद्रे,सुनीता कैलास पाटोळे,कविता किरण जुंद्रे, ताराबाई अंबादास जुंद्रे हे निवडून आले तर सचिन लक्ष्मण माळी,संगीता रतन पाटोळे,रघुनाथ लक्ष्मण जुंद्रे हे बिनविरोध निवडले गेले आहे.