देवळाली कॅम्प – लहवित येथील नवोदित लेखक संदिप गायकवाड यांच्या दारणामाईचे पाणी भाग दोन पुस्तकाचे प्रकाशन मारुती मंदिर येथे द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, अँड.एन.जी.गायकवाड, अँड.नितीन ठाकरे, सतीश पिंगळे, कैलास गायकवाड, पंडितजी आवारे आदी उपस्थित होते.यावेळी खासदार गोडसे, माजी मंत्री घोलप,अँड एन.जी.गायकवाड, नामदेव मुठाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत काळे व रघुनाथ गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लहवित गावचे पोलीस पाटील संजय गायकवाड, निवृत्ती आण्णा मुठाळ, खंडू नाना गायकवाड, व्ही.जी.काळे, विठ्ठल ढेरिंगे यांनी प्रयत्न केले याप्रसंगी अर्जुन आहेर,सोमनाथ गायकवाड,भरत आहेर, संदिप शिंदे, कैलास मुठाळ, अनिल मुठाळ,शिवाजी पाळदे, सुनिल आहेर, बाबुराव गायकवाड,शिवाजी मुठाळ, रविंद्र मालुंजकर, ज्ञानेश्वर नारोडे, मुकुंद पाळदे, राजेंद्र करंजकर, मुकुंद झनकर आदींसह विविकासोचे संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.