नाशिक – नुकतेच भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व नाशिक चे जेष्ठ उद्योजक महेशजी दाबक यांची नीती आयोगाने स्थापित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपसमितीमध्ये सदस्य पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल निमा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार कैलास आहेर, सहसचिव सुधाकर देशमुख उपस्थित होते .
सातपूर येथील युनिक सिस्टिमचे दाबक हे संस्थापक उद्योजक असून ते निमा संस्थेचे एक्स्पर्ट पॅनल मेंबर देखील आहेत. केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरण उपसमितीत काम करत असतांना एकूणच भारतीय शैक्षणिक पद्धतीत अमुलाग्र बदल होण्याच्या दिशेने पाऊले पडण्यास सुरु झाले आहे. ते सध्याच्या आधुनिक काळात अत्यंत आवश्यक बनले आहे . परंपरावादी शैक्षणिक पद्धत बदलणे अत्यावश्यक असून विद्यार्थ्यांमधील कौशल्य हेरून तसे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे जेणेकरून प्रत्येकाच्या अंगी असलेले विविध कौश्यल्य विकसित होऊन देशाचा विकास होण्यास हातभार लागेल याबाबत निमा संस्थेतर्फे सर्व उद्योजकांना सहभागी करून एकत्र काम करण्याचे आवाहन केले . याबाबत निमा तर्फे दाबक सरांबरोबर नवीन शैक्षणिक धोरणांबाबत लवकरच वेबिनार द्वारे चर्चा सत्र आयोजित करण्याचे ठरले आहे .
शिक्षणावर चर्चा
या सत्कारानिमित्त दाबक यांनी शिक्षक हा राष्ट्राचा आधारस्तंभ असल्यामुळे शिक्षकाने शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व देऊन शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांची भूमिका, भारतीय संस्कृती, शिक्षणाचे भारतीयकरण, समाजशिक्षण , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षकांचा मानसिक व बौद्धिक विकास ही काळाची गरज आहे अशा विविध विषयांवर निमाच्या पदाधिका-यांची चर्चा केली.