नाशिक – जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाल्यामुळे जळगावमध्ये त्यांचे समर्थक जल्लोष करत असतांना नाशिकमध्ये मात्र कृषीमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांची चिंता वाढली आहे. खडसे यांना राष्ट्रवादीने कृषीमंत्रीपद देण्याचे कबुल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्यांदा मिळालेलं हे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. याबदल्यात दादा भुसे यांच्याकडे गृहमंत्रीपद येईल असेही बोलले जात आहे. पण, शेतक-यांशी निगडीत असलेले भुसे यांचे खाते जाणार असल्यामुळे तूर्त तरी त्यांचे समर्थक नाराज आहे.