मुंबई – मध्य रेल्वेने दादर ते साई नगर शिर्डी -साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणे रेल्वेने प्रसिध्दीस दिला आहे.
– 02147 डाऊन साप्ताहिक विशेष दादर येथून दिनांक 05.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी 21.45 वाजता सुटेल आणि साई नगर शिर्डी येथे दुसर्या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल.
– डाऊन दिशा स्टॉप-नासिक रोड -00.47/00.50, मनमाड-01.45/01.50, कोपरगांव-02.49/02.50
– 02148 अप साप्ताहिक विशेष साई नगर शिर्डी येथून दिनांक 06.03.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी सकाळी 07.25 वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी 13.25 वाजता पोहोचेल.
– अप दिशा स्टॉप- कोपरगांव-07.59/08.00 मनमाड-08.45/08.50,. नासिक रोड-09.42/09.45
– संरचनाः 1 वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, 2 वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 7 शयनयान, 5 द्वितीय श्रेणी आसन.