नाशिक – सरकारी आणि खासगी लॅबमधील कोरोना अहवालातील मोठी तफावत लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. खासगी लॅबमध्ये रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे लक्षणीय प्रमाण पाहून यासंबंधीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ही बाब पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही गाजली होती. अखेर याप्रकरणी आता दातार जेनेटिक्स या लॅबला पुढील आदेशापर्यंत बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ही लॅब कायमस्वरुपी बंद का केली जाऊ नये, अशी नोटिसही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे. राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. या आदेशामुळे खासगी प्रयोगशाळांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे