नाशिक : दादरा नगर हवेली निर्मीत आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे. ढकांबे शिवारात केलेल्या कारवाईत तीघा तस्करांना जेरबंद करीत पथकाने वाहनासह दहा लाख रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत केला आहे. ही कारवाई कळवण विभागाच्या भरारी पथकाने केली. या कारवाईने सिमा भागातून बेकायदा होणा-या मद्यवाहतूकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
चिरागकुमार फत्तेसिंग पढीयार (२६),राघव अर्जुनभाई बारय्या (५४ रा.दोघे चौरेशी जि.सुरत) व भुपेंद्रभाई केशवभाई बारय्या (५४ रा.भगवाननगर,वेदरोड,सुरत) अशी संशयीत मद्यतस्करांची नावे आहेत. सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहळ, अधिक्षक मनोहर अंचुळे व उपअधिक्षक बी.एन.भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.२०) नाशिक सापूतारा मार्गावरील ढकांबे शिवारात नाकाबंदी लावून वाहन तपासणी केली असता मद्यतस्कर रंगेहात पथकाच्या जाळयात अडकले. भरधाव येणा-या जीजे २१ बीसी ६५७० या टीयूव्ही ३०० वाहनाची तपासणी केली असता त्यात दादरा नगर हवेली निर्मीत आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. त्यात जॉन मार्टीन,रॉयल चॅलेंज,डीएसपी व्हीस्कीचा समावेश असून विशेष म्हणजे हा साठा प्लॅस्टीक पाऊच मध्ये तात्पूरत्या स्वरूपात सिलबंद केला होता. यासोबत जिवंत बुचे मिळून आले असून हा साठा वाहतूकीनंतर सिलबंद बाटल्यांमध्ये भरण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. संशयीताच्या ताब्यातून वाहनासह ९ लाख ८५ हजार ६०० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दुय्यम निरीक्षक डी.डी.चौरे करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक आर.एस.सोनवणे,दुय्यम निरीक्षक चौरे,एम.बी.सोनार जवान दीपक आव्हाड,जी.वाय.शेवगे,एम.सी.सा
…