नाशिक – दस-याच्या दिवशी घर खरेदीचे व्यवहार व्हावे म्हणून सुट्टी असतांनाही मुद्रांक शुल्कचे पिनॅकल मॅाल येथील कार्यालय रविवारी सुरु होते. या कार्यालयात दिवसभरात शुभमुहूर्त साधत तब्बल ७ कोटी २७ लाख ८६ हजाराचे खरेदीचे व्यवहार झाले. त्यात मुद्रांक कार्यालयालयाला स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी पोटी २५ लाख ११ हजार १०० रुपये मिळाले. यात स्टॅम्प ड्युटीचे २२ लाख ३० हजार ३५० रुपये, तर नोंदणी फी पोटी २ लाख ८० हजार ७५० रुपये मिळाल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे आणि सह दुय्यम निबंधक वर्ग -२ नाशिक -३ चे अधिकारी संदीप भुसारी यांनी दिली.
रविवारी मुद्रांक कार्यालय सुरु रहावे यासाठी क्रेडाईतर्फे प्रयत्न करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली. दस-याचा शुभमुहूर्त साधत घर खरेदी बरोबरच वाहन बाजारतही मोठी गर्दी होती. येथेही कोट्यववधींची उलाढाल झाली. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॅनिक्स मार्केट, सोने चांदी खरेदी साठी ग्राहाकांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे गेल्या काही दिवसापासून व्यवहार ठप्प झाले होते. पण, दस-याच्या शुभमुहूर्तावर ते पुन्हा सुरु झाले…