गोड्या पाण्याचा कासव आणि कासवांची विविधता आणि संवर्धन
—
भारतात कासवांच्या सर्वाधिक प्रजाती असून त्यातील अनेक दुर्मिळ होत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाण्यासाठी, फेंगशुई, जादूटोणा आदींसाठी शिकार आणि त्याचा व्यवहार लाखो आणि कोटी रुपयांच्या घरात होतो. हजारो कासव त्यांच्या निवासस्थानातून पकडून आणली जातात आणि परदेशात पाळीव प्राणी म्हणून विकली जातात. वास्तविक, कासवांच्या सर्वच प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित असल्यामुळे त्यांना खाणे, पकडणे, विकणे, विकत घेणे आणि पोसणे बेकायदेशीर आहे. तरीही बेकायदेशीररीत्या त्यांचा व्यवहार होतो. उत्तर भारतात कासवांच्या मांसाहाराला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या ठिकाणी कासवाचे मटण कोंबडीच्या दरात विकले जाते मात्र, कासव खाणे हे मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकते. प्राणी प्रदूषण आणि निवासस्थाने संपुष्टात आल्यामुळेसुद्धा कासवांची संख्या कमी होत आहे. निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कासव नाहिसे झाल्यास त्याचे अनिष्ट परिणाम पृथ्वीवर होऊ शकतात. बीज प्रसार, इतर प्रजातींच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, मेलेल्या, कुजलेल्या प्राण्यांना व वनस्पतीला खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवणे यामुळे शेकडो प्रजातीसाठी आवश्यक असलेली निवासस्थाने तयार होतात. त्यामुळे कासवांचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक आहे.
कासव हा प्राणी बकरी, कोंबडी, मासोळ्या, रानडुक्कर या प्राण्यांसारखे प्रजनन करत नाही. त्यांना लैंगिकदृष्टय़ा परिपक्व होण्यासाठी १० ते ३० वर्षे लागतात. त्यामुळे पूर्ण वाढीचा एक कासव खाल्ला तरी त्याची जागा निसर्गात भरून निघण्यास किमान १५ वर्षांंचा कालावधी लागतो. कासवांच्या खाण्याचे प्रमाण जेवढे अधिक आहे, त्या तुलनेत कासवांच्या
प्रजननाची गती अतिशय कमी आहे. २५० लाख वषार्ंपासून पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या हजारो प्रजातींचे कासव नष्ट होण्यासाठी माणूसच कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.
जंगलातील तलावातसुद्धा कासव उरले नाहीत. कारण कासवांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. उत्तरप्रदेश हे कासवांच्या तस्करीचे केंद्र आहे. महाराष्ट्र आणि बंगालमधून सॉफ्टशेल टर्टल, कर्नाटकमधून अंदनी कासव अशा विविध राज्यातून विविध प्रजातीच्या कासवांची तस्करी झाल्यानंतर उत्तरप्रदेशात ते एकत्र केले जातात. मुंबईमध्ये काही महिन्यांआधी आणि एक महिन्यापूर्वी नागपुरातसुद्धा १००च्या संख्येत होणारी कासवांची तस्करी पकडण्यात आली. रेल्वे आणि हवाईमार्गे होणारी ही तस्करी व्यवस्थित तपासणी झाली तर रोखता येऊ शकते.
गोड्या पाण्यातील कासव कासव आणि संवर्धन, त्याचप्रमाणे त्यांचे जैवविविध तेथील महत्व या विषयावर महाराष्ट्र समन्वय का गौरी मल्लापुर (गोवा) या मार्गदर्शन करतात.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा:
अर्चना : 88307 68120
राहूल : 92700 76578