नवी दिल्ली – ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शो चा भाग असलेला गायक राहुल वैद्य याने आपल्या आवडत्या व्यक्तीला थेट टिव्हीवरच प्रपोज केले आहे. त्याची आवडती व्यक्ती आहे दिशा परमार. त्याच्या या अनोख्या प्रपोजने राहुलच्या आईला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राहुलच्या या निर्णयाने आपण खुश असल्याचे त्याची आई गीता वैद्य यांनी सांगितले. मात्र, या संदर्भात त्यांनी आणखी काही बोलण्यास नकार दिला. राहुल बाहेर आला की, त्याच्याशी बोलून बाकीच्या गोष्टी ठरवू, असेही त्यांनी सांगितले.
अशाप्रकारे टीव्हीवर प्रपोज करून राहुलने मला सुखद धक्काच दिला आहे. दिशा एक खूप चांगली मुलगी आहे. ती मला पण फार आवडते.
दिशा परमार हीच वाढदिवस ११ नोव्हेंबर रोजी होता. त्याच दिवशी तिला टीव्हीच्या माध्यमातून राहुल वैद्यने प्रपोज केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. आता दिशा परमार काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिशा आपल्या मित्र मैत्रिणींशी बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती खूप खुश दिसते आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, असे दिशाने म्हटल्यावर मैत्रिणी तिला प्रपोजबद्दल विचारताना दिसत आहेत, तर दिशा लाजून आपले तोंड लपवताना दिसते आहे.