नाशिक – टेरेस, कॉलनी अथवा मोकळ्या जागांवर किंवा एकत्रीतरित्या सार्वजनिक ठिकाणी नववर्षाच्या स्वागत केल्यास याद राखा असा सज्जड दमच पोलीसांनी दिला आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री तीन हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यांवर उतरणार असून, रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जगभरात जल्लोषात स्वागत केले जाते. नाशिकही त्याला अपवाद नाही. दरवर्षी थर्टी फर्स्टचा जल्लोष नाशिकमध्येही अनुभवता येतो. परंतु यंदा या उत्सवावर करोना संसर्गाच सावट आहे. करोना संसगार्ला आळा घालण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि प्रशासनापुढे आहे. त्यामुळेच सरकारने रात्री ११ ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. पोलीस आयुक्तांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले असून थर्टी फर्स्टला या आदेशांचे शहरवासियांनी कसोशीने पालन करावे असे आवाहन निशानदार यांनी केले आहे. थर्टी फर्स्टच्या पूर्व संध्येला निशानदार यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदोबस्ताबाबतची माहिती दिली.
शहरात संचारबंदी असल्याने अनेक लोकांचे शहराबाहेर जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे नियोजन आहे. ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजेपासून ते १ जानेवारीला सकाळी सहा वाजेपर्यंत या नागरिकांनी शहरात परतू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून वाहनांची व नागरिकांची कसून चौकशी केली जाणार आहे. सर्व व्यावसायिक आस्थापना रात्री ११ वाजेनंतर बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाºयांची नवीन वषार्ची सुरूवात पोलिस कारवाईने होणार असून ही कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन निशानदार यांनी केले आहे. मुबंईप्रमाणेच नाशिकमध्ये देखील टेरेस, मोकळी मैदाने, सोसायटया, कॉलनी यांसारख्या ठिकाणी एकत्रित जमून थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यास बंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी घरांमध्ये कौटुंबीक पातळीवर सेलिब्रेशन करणे अपेक्षित आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºयांची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षास कळवावी. संबंधित ठिकाणचे पोलिस अधिकारी, कर्मचारी तेथे पोहोचून कारवाई करतील असेही निशानदार यांनी स्पष्ट केले आहे.