नाशिक – महानगरपालिकाने शहरातील सुमारे १ लाख ३० हजार मालमत्ताधारक थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १ हजार थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही थकबाकी भरली नाही तर ७५ टक्के दंड आकारला जाणार आहे.
महसुलात ३५ % घट
५००० रुपयांपेक्षा कमी कर असणाऱ्यांना महापालिकेने नोटिसा देत आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोविड १९ मुळे मालमत्ता कराच्या संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात १०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. चालू आर्थिक वर्षात तो आतापर्यंत ६५ कोटी इतकाच झाला आहे. महसूल संकलनात यंदा सुमारे ३५% घट झाली आहे.
..तर मालमत्ता जप्ती
शहरातील जवळपास १ लाखाहून अधिक थकबाकीदरांची रक्कम ५००० व त्यापेक्षा कमी असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संबंधित थकबाकीदारांसाठी ही शेवटची संधी असून विलंब केल्यास थकबाकीच्या रकमेवर ७५ टक्के दंड आकाराला जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कर्ज माफी संपेपर्यंत म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत देय रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ता जप्त करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १५० कोटी महसूल संकलित करण्याचे ध्येय महापालिकेने ठेवले आहे.