नवी दिल्ली – जगात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढतांना दिसत असून भारतात हिवाळ्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतात आतापर्यंत ७५ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे. भारतात अद्याप हिवाळा सुरू झालेला नाही, परंतु हिवाळ्यात येत्या काही महिन्यांत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
थंडीत कोरोना का वाढणार? बघा ही आहेत दहा कारणे…
१. ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांत हिवाळा सुरु झाला आहे. याच काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
२. ब्रिटनमध्ये १२ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
३. संसर्ग वाढल्यानंतर सुरुवातीच्या काळात गरम आणि थंड हवामानामुळे कोरोना विषाणूचा नाश होऊ शकतो अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. मात्र, आता हिवाळ्यात रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
४. हिवाळ्यात प्रामुख्याने फ्लू पसरण्याचा शक्यता जास्त असतात. त्याच अनुषंगाने, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.
५. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रथम वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते, त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या कळस गाढणार अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
६. हिवाळ्यात श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याने संसर्ग वाढण्याचे धोके जास्त असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
७. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भारतात संपूर्ण अनलॉक होण्याची शक्यता आहे. गाड्या, उड्डाणे, आंतरदेशीय प्रवास सुरू होणार असल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते.
८. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार याआधी आलेल्या महामारीची दुसरी लाट पुढील सहा महिन्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेणे बंधनकारक असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
९.हिवाळ्यात महाराष्ट्रामध्ये स्वाईनफ्लूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे संशोधनातुन समोर आले आहे.
१०. हवामानातील बदलांमुळे कोरोनाच्या विषाणूत कोणताही बदल झालेला नाही, परंतु ज्या देशांमध्ये तापमान कमी होण्यास सुरवात झाली आहे अशा देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे, देशात हिवाळ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बर्याच युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दुसऱ्या लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली आहे.