ग्वाल्हेर – मनुष्याच्या जीवनात वेळ आणि परिस्थिती नेहमीच सारखी नसते. परिस्थिती कधी बदलते हे कोणालाही ठाऊक नसते. याचे एक वास्तविक उदाहरण सध्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये निदर्शनास आले आहे. सध्या हिवाळा असल्याने थंडीत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्याला मदत करायला एक पोलिस अधिकारी गेला आणि बघतो तर काय तो भिकारी माजी पोलिस अधिकारी निघाला.
या आठवड्यात ग्वाल्हेरमधील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी पोलीस उपायुक्त रत्नेशसिंग तोमर आणि विजयसिंग भदोरिया हे गस्त घालत असताना झाशी रोडवरून जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक भिकारी पाहिला. थंडीत कुडकुडणारा तो भिकारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधत होता. हे पाहून दोन्ही पोलिस अधिकारी थांबले आणि ते भिकार्याकडे पोचले. थंडीत कुडकुडताना त्या भिकाऱ्याची झालेली वाईट अवस्था पाहून एका अधिकाऱ्याने त्याला जॅकेट दिले तर दुसर्याने बूट दिला. यानंतर दोघांनीही भिकार्याशी बोलायला सुरुवात केली.
संभाषणानंतर दोन्ही अधिकारी आश्चर्यचकित झाले. चर्चेत भिकाऱ्याने सांगितले की, तो स्वतः पोलीस विभागाच्या एका तुकडीचा अधिकारी आहे. तसेच याने आपले नाव मनीष मिश्रा असे ठेवले. मिश्रा म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून अशा परिस्थितीत फिरत आहेत.
आता त्या तिघांचे संभाषण जसजसे पुढे चालू झाले, तसतसे मनीष मिश्रा यांचे मानसिक संतुलन गमावले, हे उघड झाले, तो सुरुवातीला पाच वर्षे घरी राहिला, त्यानंतर कामावरून काढून टाकल्याने तो कायमचा घरीच राहिला नाही, त्यानंतर त्याला रुग्णालयात आणि आश्रमात उपचारासाठी दाखल केले गेले. मात्र येथूनही निघून आला होता, तेव्हापासून ते रस्त्यावर भीक मागून आपले जीवन व्यतीत करत आहेत.
वास्तविक मनीष हा एकेकाळी दोन्ही अधिकाऱ्यासह 1999 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर भरती झाला. त्यांनी 2005 पर्यंत पोलिस नोकरी केली होती आणि शेवटच्या वेळी दतिया येथे तैनात होते. तो एक उत्तम नेमबाज होता. तथापि, दिवसेंदिवस बिघडणारी मानसिक स्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याच्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिला.
मनीषबद्दल सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सोबत जायला तयार झाला नाही. यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी मनीषला एका सामाजिक संस्थेत पाठविले, जिथे त्याच्यावर योग्य उपचार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषचा भाऊही ठाणेदार असून वडील व काका एसपीपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची एक बहीण एका परदेशी दूतावासात चांगल्या पदावर आहे. त्याच्यापासून घटस्फोट घेतलेल्या मनीषची पत्नी देखील न्यायालयीन विभागात कार्यरत आहे.