मुंबई – गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे त्वचेची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. तसे केले तरच आपण थंडी एन्जॉय करू शकतो.
या बाबी लक्षात ठेवा
– थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे ती मऊ, मुलायम राहील याकडे लक्ष देणं हे महत्त्वाचे आहे. यासाठी चांगल्या क्रीमचा वापर आपण करू शकतो. पण, हे क्रीम घेताना ते वॉटर बेस्ड घेण्यापेक्षा क्रीम बेस्ड घ्यायला हवे. म्हणजे त्वचेला त्याचा फायदा होईल.
– त्वचा ओलसर ठेवण्यासाठी आपण तेलाने मालिश देखील करू शकतो. मालिश म्हणजे खूपवेळ करण्याची आवश्यकता नाही. सकाळी उठल्यावर नारळाचे तेल थोडं कोमट करून ते शरीराला हळुवार लावावे. तासभर ठेवावे. जर तुम्ही यात सातत्य ठेवलं तर तुमची त्वचा सतेज होईल.
– अनेकदा क्रीम लावल्याने किंवा त्वचेवर बरेच प्रयोग केल्याने त्वचेची रंध्रे बुजतात. यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी एखादा स्क्रब करावा. वाफ घ्यावी, ज्यायोगे त्वचेची रंध्रे मोकळी होतील.
– थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायले जाते. खरंतर हे चुकीचं आहे. कमी पाणी प्यायल्याने डीहायड्रेशन होते. आणि त्वचेचे नुकसान होते. मुळात थंडीच्या दिवसात तहान लागत नसल्याने पाणी कमी प्यायले जाते. असे करू नका. पुरेसे पाणी पिणे हे त्वचेच्या हिताचे असते.
– याशिवाय कोणाला कसली ऍलर्जी वगैरे असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे केंव्हाही फायद्याचे. या गोष्टी पाळल्यात तर तुम्ही ही थंडी नक्कीच एन्जॉय करू शकाल.