मुंबई – भारतीय आटोमोबाईल मार्केटमध्ये हॅचबॅक कारची चांगलीच मागणी राहिलेली आहे. कमी किंमत, कमी मेन्टनन्स आणि उत्तम मायलेजमुळे जास्तीत जास्त भारतीयांचा हॅचबॅक कारकडे कल आहे. आता तुम्हालाही जर हॅचबॅक कार घ्यायच्या असतील तर एक उत्तम संधी चालून आली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आदी ब्रांड्सने आपल्या स्वस्त हॅचबॅक कारवर डिस्काऊंट घोषित केला आहे.
Hyundai Santro
ह्युंदाईने या महिन्यापासून सर्वांत स्वस्त एन्ट्री लेव्हल कार सँट्रोच्या किंमतीवर मोठी सूट जाहीर केली आहे. या महिन्यात जर ही कार खरेदी केली तर ५० हजार रुपयांची जबदरस्त सवलत मिळणार आहे. याशिवाय एक्स्चेंज बोनससह इतरही फायदे होणार आहे. १.१ लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजीन यामध्ये आहे. तर ४.६७ लाख ते ६.३५ लाख रुपयांपर्यंतची रेंज आहे. २० किलोमीटर प्रतीलीटर असे मायलेज आहे.
