मुंबई – आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी उत्तम संधी आहे. कारण सेंट्रल रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने शिकाऊ उमेदवार पदासाठी अधिसूचना काढलेली आहे. याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूरसह इतर विभागांसाठी पदभरती होणार आहे. एकूण २५०० पदांवर या नियुक्ती होणार असून इच्छुकांना ५ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. त्यासाठी https://www.rrccr.com/Home या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. मात्र अर्जात छोटीशी चूक झाली तरीही तो रिजेक्ट होणार आहे, त्यामुळे उमेदवारांना काळजीपूर्वक अर्ज भरावा लागणार आहे.
सेंट्रल रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या वतीने काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार शिकाऊ उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १० वी पास किंवा तत्सम वर्ग ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच उमेदवाराचे वय २४पेक्षा जास्त नको. आरक्षणानुसार संबंधित उमेदवारांना काही सवलती दिल्या जातील. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता १०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित केले आहे.
कुठे किती पदे…
सोलापूर: कॅरिज आणि वॅगन डेपो – ५८ पदे
कुर्दुवाडी कार्यशाळा – २१ पदे
पुणे:
कॅरिज आणि वॅगन डेपो – ३१ पदे
डीझेल लोको शेड – १२१ पदे
नागपूर
इलेक्ट्रिक लोको शेड – ४८ पदे
अजनी कॅरिज आणि वॅगन डेपो – ६६ पदे
अशी होईल निवड
या पदांसाठी आनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड दहावीतील गुणांच्या आधारावर होईल. याशिवाय एखाद्या उमेदवाराने उच्चशिक्षण घेतले असेल तरीही त्याचे दहावीतील गुणच ग्राह्य धरले जाणार आहेत.