त्र्यंबेकश्वर – त्र्यंबेकश्वर येथे हरितालिका पुजनासाठी महिलांनी जुना महादेव मंदिरात गर्दी केली. महिला एकत्र येवून घरोघर वालुकेची शिवपिंड तयार करून पूजा करतात. यावेळेस मात्र वैयक्तीक पुजेवर भर होता. पूजा आटोपल्या नंतर पत्री वाहण्यासाठी व दर्शनासाठी त्र्यंबेकश्वर मंदिरात जाण्याची प्रथा आहे. यावर्षी मंदिर बंद असल्याने महिलांनी आहिल्या गोदावरी संगमावर असलेल्या जुना महादेव मंदिरात पूजा केली. दरम्यान शहरातील इतर शिव मंदिरांमध्ये देखील दर्शनासाठी महिलांची गर्दी होती.
बाजारात उलाढाल ५० टक्के
हरितालीकेच्या निमित्ताने नव्या साडया आणि ड्रेस आदिंची खरेदी होत असते. यावर्षी त्याचे प्रमाण घटले आहे. कासारांच्या दुकानात बांगडया भरण्यासाठी देखील पुर्वीसारखी गर्दी झाली नाही. बांगडया, मेहंदी कोन आदि साहित्य विक्री करणा-यांनी यावर्षी ५० टक्के देखील व्यवसाय झाला नाही. फळांची विक्री, पुजा साहित्य यांना देखील करोनाचा फटका बसला आहे.