शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आदर्श निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन करत प्रत्येकाने शिवजन्मदिनी आपल्या घरावर भगवा ध्वज उभारून अंगणात रांगोळी रेखाटून,विदुयत रोषणाई करत सनाप्रमाणे शिवजन्मदिन साजरा करावे शिवजन्मोत्सव समितीचे वतीने करण्यात आले.यावेळी संदीप चव्हाण .दिलीप चव्हाण . पैलवान सचिन बोडके. सोनू वारुणसे .प्रवीण चव्हाण. राज चव्हाण .पप्पू कडलग. आदि मान्यवर उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर शहरात होणार मोठया प्रमाणात शिवजयंती
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वर शहर व तालुका मिळून १९ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेत मिरवणूक काढत शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच शिवजन्मोत्सव समितीच तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर तालुका ग्रामीण कार्यकारणी
अध्यक्ष : समाधान सकाळे
उपाध्यक्ष : दिलीप मुळाणे
कार्याध्यक्ष : शिवाजी बोडके
खजिनदार : रवि वारूगसे
सरचिटणीस: समाधान आहेर