त्र्यंबकेश्वर –त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे जिप शाळेच्या पन्नास लाख रुपये किंमतीच्या तीन वर्ग खोल्या व मुला मुलीं करिता स्वतंत्र शौचालय यांचे युनिटचे भूमिपूजन शिवसेना तालुका समन्वयक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समाधान बोडकेपाटील, एस.एन.एस.फाऊंडेशनचे प्लांट मॅनेजर प्रसन्न हलगी व समन्वयक राम बडगुजर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच नानासाहेब उघडे होते..
केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत दहा लाख रुपये व एसएनएस फाऊंडेशनच्या माध्यमातून चाळीस लाख रुपये वर्गखोल्या व शौचालय युनिट करिता मंजूर करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान बोडकेपाटील यांनी शाळेत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापना बरोबरच भविष्यात इंग्लिश मिडीयम स्कूल टाईम जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाची जिप ची शाळा एसएनएस फाऊंडेशन व शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कामं करून बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थितीत एस.एन.एस.फाऊंडेशचे प्लांट मॅनेजर प्रसन्न हलगी, बडगुजर साहेब,गणेश सर कॉन्ट्रॅक्टर विजय सोनवणे, शिवसेना नेते समाधान बोडकेपाटील,सरपंच नानासाहेब उघडे,उपसरपंच राजुभाऊ बोडके,ग्रामसेविका श्रीम.योगिता पुंड , शा.व्य. समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब काशिद,सदस्य वसंत बोडके,सोमनाथ उघडे, मुख्याध्यापक कैलास सोनवणे उपशिक्षक उपस्थितीत होते, सर,एस.एन.एस.फौंडेशचे पुराणिक सर,श्रीम.चौधरी ,नामदेव खोडे, उपस्थितीत होते. सुत्रसंचालन आदर्श शिक्षक नामदेव बेलदार यांनी तर आभार मुख्याध्यापक कैलास सोनवणे यांनी मानले..